Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Kiran Lahamate : धनगर आरक्षणावरून अजित पवार गटाच्या आमदाराचा सरकारला घराचा आहेर; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

Ahmednagar News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. यावरून आमदार किरण लहामटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

अकोले (अहमदनगर) : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण असून आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसे केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल; असा इशाराच राज्यातील सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सरकारला दिला आहे.

धनगर समाजाला (Dhangar Reservation) एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. यावरून आमदार किरण लहामटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आमदार नरहरी झिरवाळी यांच्यानंतर सत्तेत असेलेल्या अजित पवार गटाच्या दुसऱ्या आमदाराकडून विरोध करण्यात येत आहे. डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले, कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ४७ जमातीला आरक्षण दिले आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणीही पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायच असेल, तर स्वतंत्र द्यावे. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र असून सरकार असा का विचार करतय? किंवा काही संघटनांना का वाटतय आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तस झाल तर उग्र स्वरूपाच आंदोलन केले जाईल; असा इशारा दिला. 

सरकारने पुन्हा एकदा विचार करून निर्णय घ्यावा 
मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमीनी आम्ही दिल्या शोषण आमच झाल. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिले आहे, त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिल त्याची भरती देखील होत नाही. आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय हे सगळ निषेधार्ह असून  सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावे; अशी मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT