ahmednagar akole girlfriend and boyfriend ended her life journey in kasara Saam TV
महाराष्ट्र

Shocking News: सुखी संसाराचे स्वप्न, अहमदनगरमधून प्रेमीयुगुलाचे पलायन; कसारा येथे आढळले मृतदेह

Kasara Latest News Today: ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कसारा येथील वीर तानाजीनगर परिसरातील एका घरात प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले आहेत.

Satish Daud

फैयाज शेख, साम टीव्ही

Kasara Latest News Today: ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कसारा येथील वीर तानाजीनगर परिसरातील एका घरात प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले आहेत. सोमनाथ सोनवणे (वय २३ वर्ष) आणि सुजाता देशमुख (वय २१ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. सोमनाथ आणि सुजाता यांनी आत्महत्या करण्याचं कारण काय? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि सुजाता हे मूळ अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवाशी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दीड महिन्यांपूर्वी दोघेही घर सोडून कसारा येथील तानाजीनगर परिसरात आले होते.

दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी सोमनाथ आणि सुजाताने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घरमालकाला दोघांचेही मृतदेह एकमेकांच्या बाजूला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती कसारा पोलिसांना दिली.

माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. तडवी, उपनिरीक्षक एस.बी. जाधव पथकासह दाखल झाले. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबियांना फोनवरुन संपर्क साधत घटनेची माहिती दिली. दोघांचेही मृतदेह अकोले येथे नेल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहीली नसल्याने कारण कळू शकले नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT