Ahmednagar Saam
महाराष्ट्र

Ahilyanagar: शिक्षक की हैवान? भर वर्गात शिक्षकाचे विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

Teacher Arrested for Molesting Minor Girls in Ahilyanagar: अहिल्यानगरात अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. अहिल्यानगरात अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आश्रमशाळेत एक शिक्षक विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे करायचा. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे एक आश्रमशाळा आहे. या शाळेतील एका शिक्षकाने तिसरी आणि चौथी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनींशी अश्लील वर्तन केले आहे. गणेश खांडवे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक तिसरी आणि चौथीतील विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची माहिती आहे. शिकवत असतानाच हा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत अश्लील वर्तन करायचा.

तसेच विद्यार्थीनींसमोर अश्लील चाळे करायचा. एका मुलीने आपल्या पालकांना याची माहिती दिली. विद्यार्थीनीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी फरार झाला. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी चौकशी करून आरोपी गणेश खांडवेला बेड्या ठोकल्या आहेत. या शिक्षकाने याआधीही असा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकल्या मुलींच्या अजानतेपणाचा फायदा घेत त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून आणखी काही जणींची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra News Live Update: सरकारची योजना बनली शेतकऱ्याच्या शेती विक्रीचे कारण

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

SCROLL FOR NEXT