Ahmednagar Accident News Saamtv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident: भीषण अपघात! ट्रक- दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahmednagar Accident News: करंजी घाटात रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुध टँकरचा भीषण अपघात झाला.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी

Ahmednagar Accident:

अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरमधून (Ahmednagar) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुध टँकरचा भीषण अपघात झाला.

अपघात झालेला ट्रक पैठणवरुन शेंगदाण्याचे कट्टे घेऊन नगरकडे चालला होता. तर दुधाचा रिकामा टँकर करंजीकडे येत होता. दोन्ही वाहने करंजी घाटात आली असता समोरा-समोर धड झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्हीही वाहनांचा अक्षरशः चक्काकूर झाला.

या भयंकर अपघातात ट्रक चालक जावेद मन्सुर शेख आणि टँरर चालक शिवाजी नानासाहेब भवार हे दोघे ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मद केली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यात भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

दरम्यान, सोमवारी (१६, ऑक्टोंबर) पुण्यामध्येही भीषण अपघाताची घटना घडली. पुण्यात स्वामी नारायण मंदिराजवळ कंटेनरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मुत्यू झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला, नागपूर ते मुंबई प्रवासासाठी मोजावे लागणार २२,८०० रुपये

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT