Ahmednagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident : भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला खाली; मोठी दुर्घटना टळली

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावर अत्यंत रहदारीच्या रोडवर असलेल्या नगर- सोलापूर चौकातच हा अपघात झाला आहे.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : अहमदनगर शहरातुन गेलेल्या मतदान पुलावरून भरधाव वेगाने जाणारा टेम्पो थेट उड्डाण पुलावरील जाळ्या तोडून खाली कोसळला. टेम्पो पुलावरून कोसळल्याने जोरदार आवाज झाल्याने परिसरात घाबरत पसरली होती. दरम्यान या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. 

अहमदनगर (Ahmednagar) शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावर अत्यंत रहदारीच्या रोडवर असलेल्या नगर- सोलापूर चौकातच हा अपघात झाला आहे. शहरातून गेलेल्या या उडडाणपुलावर वळण रस्ता आहे. याच ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पुलाच्या खाली कोसळला. दरम्यान या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident) अपघातानंतर मात्र परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

यापूर्वीही अनेक अपघात 

अपघात झाला त्या ठिकाणी याआधीही अनेक वेळा दुचाकी आणि चार चाकी या उड्डाणपूलावरून खाली पडले आहेत. ज्या ठिकाणी वळण आहे. त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चार चाकी खाली पडत असल्यामुळे हे वळण चुकीचे असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT