Gas Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Gas Cylinder Blast : गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे या गावात पंधरा दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहाता (अहमदनगर) : सकाळच्या सुमारास स्वयंपाक करत असताना गॅस संपल्याने सिलेंडर बडविले. यानंतर गॅस लिकेज होऊन त्याचा स्फोट झाला होता. यामध्ये परिवारातील ९ जण जखमी झाले असता, यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे या गावात पंधरा दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. सिलेंडर बडविल्यानंतर यातून गॅस लिकेज होत असल्याने सिलेंडर बाहेर आणले. या वेळी बाहेर चूल पेटलेली असल्याने या आगीमुळे सिलेंडरचा भडका उडाला. या घटनेत ९ जणांसह शेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरे देखील भाजले गेले होते. दरम्यान जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यातील सुरेश भाऊसाहेब वायकर या तरुणाचा उपचारा दरम्यान (Death) मृत्यू झाला आहे. 

अन्य जखमींवर उपचार सुरुच 

गॅस सिलेंडर स्फोटात परिवारातील ९ जण जखमी झाले होते. यातील एका जणांचा मृत्यू झाला असून अन्य आठ जखमींवर अजूनही उपचार सुरु आहेत. दरम्यान घरातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT