Ahmedabad Fire News Saam TV
महाराष्ट्र

Ahmedabad Fire News: अहमदाबादमध्ये अग्नितांडव; १०० हून अधिक रुग्ण असलेल्या रुग्णालयाला भीषण आग

Fire In Hospital: तसेच दुसऱ्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Ruchika Jadhav

Ahmedabad News: अहमदाबाद येथून आगीची एक मोठी घटना समोर आली आहे. अहमदाबादमधील एका रुग्णालयाला भीषण आग लागलीये. रविवारी पहाटे ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

१०० हून अधिक रुग्ण रुग्णालयात

पहाटेच्या वेळी आग लागली तेव्हा १०० हून अधिक रुग्ण हॉस्पिटलमध्ये होते. या सर्वांना रुग्णालय प्रशासनाने तातडीने बाहेर काढले. तसेच दुसऱ्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीवर नियंत्रण मिळणव्यास यश

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदाबादमधील राजस्थान रुग्णालयाला पहाटे ४.३० च्या सुमारास तळघरात आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ५ तास अग्निशमन दलाचे जवान काम करत होते. पाच तासांनी आग शांत झाली आहे.

दरम्यान, अहमदाबाद शहरातील हे रुग्णालय फार मोठे आहे. येथे अनेक आजारांवर उपचार केले जातात. अन्य शहरांमधील नागरिक देखील या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. शहरातील बड्या रुग्णालयात ही घटना घडल्यानं रुग्णांसह इतर नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT