Ahilyanagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar News : निकालाआधीच लागले उमेदवारांचे विजयी फ्लेक्स; अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी झळकले बॅनर

Ahilyanagar News : निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले असून येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यभरात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता प्रत्येक मतदारसंघात विजय कोणाचा याचे गणित मांडले जात आहे. मात्र अहिल्यानगर शहरात निकाल लागल्याआधीच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवाराच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर मतदानाची प्रक्रिया देखील पार पडली आहे. अर्थात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले असून येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतांची आकडेवारी काढत कोण विजयो होणार याचे गणित बांधत आहेत.

मात्र अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होणार असल्याचे बॅनर आतापासून झळकू लागले आहे. अहिल्यानगर मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर शहरात ठीकठिकाणी लावण्यात आले आहेत.

संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून कालच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. येत्या २३ तारखेला प्रत्यक्ष निकाल समोर येणार आहे. मात्र ते आधीच अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT