Ahilyanagar Sarpanch Hunger Strike  Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar News: गावात झाली, आता राज्यभरात बंदी घाला; शिव्यांवरील बंदीसाठी सरपंचाचं आमरण उपोषण

Ahilyanagar Sarpanch Hunger Strike : माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी सरपंचाने गावात शिव्यांवर बंदी घातलीय. जो व्यक्ती शिवी देईल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा त्यांनी निर्देश काढलाय.

Bharat Jadhav

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायत आणि गावचे सरपंच विविध उपक्रम गावात राबवत असतात. पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी योजना आणल्या जातात. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या सौंदळा गावातील सरपंचाने एक अगळा-वेगळा उपक्रम हाती घेतलाय. माता-भगिनींचा सन्मान राखण्यासाठी त्यांनी गावात शिव्यांना बंदी घातलीय. आता आया-बहिणींचा सन्मान करण्यासाठी या सरपंचाने थेट उपोषणाचा एल्गार उगारलाय.

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी ग्रामसभेचा ठराव घेऊन गावात शिव्याबंदीचा ठराव घेण्यात आला. जो कोणी शिवी देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. आता शासनाने देखील राज्यभरात शिव्या बंदीचा निर्णय घेऊन माता - भगिनींचा सन्मान करावा, या मागणीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय.

छोटे मोठे भांडण झाल्यावर माता भगिनींचा काही संबंध नसताना अनेकदा शिव्यांचा माध्यमातून महिलांना अपमानित केले जाते. तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन, कोर्टापर्यंत प्रकरण जातात. त्यामुळे वेळ पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने शिव्या बंदीचा ठराव करून माता-भगिनींचा सन्मान केलाय.

गावात शिव्या देणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात येतो, त्यामुळे शिव्या देणे थांबले असून त्याचे सकारात्मक परिणाम गावात दिसू लागले आहेत.. महाराष्ट्र शासनाने देखील राज्यभरात शिव्या बंदीचा कायदा आणून माता-भगिनींचा सन्मान करावा अशी मागणी सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी केली आहे. आरगडे यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT