Ahilyanagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Crime : सहा महिन्यांपासून पत्नी सोडून गेल्याने पतीचे भयानक कृत्य; पत्नीच्या अंगावर टाकले ऍसिड

Ahilyanagar news : पतीने पत्नीला उद्देशून तू मला सोडून इकडे का निघून आली; असे म्हणतच पांडव याने पत्नी सोनाली हिच्यावर बाटलीतील ॲसिड अंगावर टाकले

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या पाथर्डीत पती- पत्नीच्या वादातून पतीने पत्नीवर ऍसिड टाकून गंभीर जखमी केले आहे. जखमी झालेल्या पत्नीवर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद असून या वादातूनच पतीने भयानक कृत्य केले आहे.  

सोनाली दत्तात्रय भाळवणकर (वय २८) असे घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान रविवारी (३ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पती निलेश उर्फ चंद्रकांत रमेश पांडव (रा. धारूर जि. बीड) हा पत्नी राहत असलेल्या (Pathardi) पाथर्डी शहरातील नाथनगर या घरी आला. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला उद्देशून तू मला सोडून इकडे का निघून आली; असे म्हणतच पांडव याने पत्नी सोनाली हिच्यावर बाटलीतील ॲसिड अंगावर टाकले. ऍसिड टाकल्याने सोनाली हिने आरडा ओरडा केली. (Crime News) यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी महिलेची मदत केल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. 

सदर घटनेत महिला वीस टक्के भाजली गेली आहे. महिलेचा एक हात, मानेची बाजू व कमरेपासून खालचा भाग भाजला गेला आहे. सहा महिन्यापासून हे पती पत्नी विभक्त राहत होते. याचाच राग मनात धरून पती पांडव याने ॲसिड अंगावर टाकून गंभीर प्रकारे जखमी केले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संशयित पाटील घटनास्थळावरून तात्काळ ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, राम सोनवणे, सुखदेव धोत्रे, गोपाळ ढवळे हे घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT