Nevasa Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Nevasa Vidhan Sabha : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची भाजपमधून हकालपट्टी; बंडखोरी करत भरलेला अर्ज कायम ठेवल्याने कारवाई

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाला जागा सुटली होती.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

नेवासा (अहिल्यानगर) : विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यानुसारच नेवासा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या जागेवर भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी उमेदवारी अर्ज दाखल केला. माघारीनंतर हा अर्ज त्यांनी कायम ठेवल्याने भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील (nevasa) नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाला जागा सुटली होती. यामुळे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र पक्षाने माघार घ्यायला सांगूनही मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने (BJP) भाजपने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

भाजपकडे असलेली नेवासा विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली असून याठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आल्याने बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी केली आहे. याशिवाय या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार देखील असल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT