Case Filed Against Dog Owner Saam Tv
महाराष्ट्र

Ahilyanagar News: श्वानाच्या चुकीमुळे वाढली मालकाची डोकेदुखी, पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल

Case Filed Against Dog Owner : एका श्वानाची मालकाला महागात पडलीय. श्वानाच्या चुकीमुळे एका चालक महिलेचा अपघात घडला. त्यामुळे पोलिसांनी मालकाविरोधात गुन्हा नोंदवलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे. साम प्रतिनिधी

तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे, त्याला फिरायला नेताय तर सावधान. तुमच्या श्वानाची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. बऱ्याचवेळा धावत्या बाईक मागे किंवा कारमागे कुत्रे धावत सुटत असतात, अशावेळी बाईक चालक भीतीमुळे वाहनाचा स्पीड वाढवतात. त्यामुळे अपघात घडतात. श्वानाची ही चुकी मालकांसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.

आहिल्यानगरमध्ये अशीच घटना घडलीय, एका श्वानाच्या चुकीमुळे मालकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. महिलेच्या अपघातास कारण ठरल्याने एका पाळीव कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ही घटना घडलीय. पोलीस फिर्यादीत आरोपीच्या नावापुढे डॉ. पानसरे यांचा पाळीव कुत्रा असे नमूद करण्यात आल्याने सुरुवातीला कुत्र्यावर गुन्हा दाखल झाल्याचा गैरसमज झाला होता.

मात्र हा गुन्हा कुत्र्याच्या मालकावर दाखल झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलंय. संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील स्वाती शिंदे या 15 जानेवारी रोजी दुचाकीवरून जात असताना तेथे राहणारे डॉ. पानसरे यांचा रॉटविलर जातीचा पाळीव कुत्रा अचानक गेट मधून त्यांच्या दिशेने जोरात धावत आला.. त्यामुळे घाबरेल्या स्वाती शिंदे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्या स्कूटीसह कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या.

या अपघातात स्वाती शिंदे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबावरून पाळीव कुत्र्याचे मालक डॉ. पानसरे यांच्यावर संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.तर माझ्या पत्नीला भरपाई मिळावी, अशी मागणी महिलेचे पती कालिदास शिंदे यांनी केली आहे.

हौस म्हणून कुत्री पाळली जातात. त्याच्या मालकाला त्याच्या प्रती कितीही प्रेम असले तरी लोकांना कुत्र्याची भीती असते. त्यामुळे अनेकदा गंभीर इजा होऊ शकते. पाळीव कुत्रा पाळताना हलगर्जीपणा केला तर अशा प्रकारे गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे श्वान प्रेमींनी दक्षता घ्यायला हवी हे मात्र नक्की.

भाविकांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. कुत्र्याने १० जणांना चावा घेतला होता. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरामध्ये भीतीचे वातावरण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT