Shrigonda Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Shrigonda Vidhan Sabha : श्रीगोंदा मतदारसंघात आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीचे इच्छुक राहुल जगतापांनी भरला अर्ज

Ahilyanagar news : अहिल्यानगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या दिवशी माजी आमदार राहुल जगताप यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहिल्या नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील बंडखोरी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरे सेनेने उमेदवारी दिली असतांना राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या राहुल जगतापांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अहिल्यानगरच्या (Shrigonda News) श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या दिवशी माजी आमदार राहुल जगताप यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल जगताप यांच्या मिरवणुकीत आणि सभास्थळी बॅनरवर शरद पवारांचे फोटो झळकल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

राहुल जगताप हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेना ठाकरे गटाला (Mahavikas Aaghadi) गेल्याने राहुल जगताप यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे राहुल जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर यंदा लोकसभेप्रमाणे श्रीगोंद्यात सांगली पॅटर्न दिसत असल्याचे मत राहुल जगताप यांनी व्यक्त केला आहे. तर आजच्या गर्दीवरूनच विजयाची विश्वास देखील त्यांनी व्यक्त करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT