14 year old girl suspected of GBS virus pp0731 SaamTv
महाराष्ट्र

GBS Update News: नागरिकांनो काळजी घ्या! GBS व्हायरसचा विळखा वाढता वाढे, नगरमध्ये चिमुकली संशयित रुग्ण

Ahilyanagar GBS Patient Found: हा आजार होणार नाही, यासाठी नागरिकांनी स्वच्छता ठेवावी, स्वच्छ पाणी प्यावे, ताजे खावे, शरीर सुदृढ करावे, असं आवाहन नागोराव चव्हाण यांनी केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील एक जीबीएस या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण १४ वर्ष वयाची मुलगी आहे. तिला पुढील तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

अहिल्यानगर शहरातील एक १४ वर्ष वयाची मुलगी शनिवारी जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आली होती. तिच्या पायात अशक्तपणा जाणवत होता. तसेच तिला पूर्वी तापही येऊन गेला होता. ती जीबीएस आजाराची संशयित वाटली. तिला पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. मात्र, सदर रुग्ण ही संशयित आहे, अद्याप तिचा कोणताही अहवाल आलेला नाहीय, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिलीय.

काय काळजी घ्यावी?

हा आजार होणार नाही, यासाठी नागरिकांनी स्वच्छता ठेवावी, स्वच्छ पाणी प्यावे, ताजे खावे, शरीर सुदृढ करावे, असं आवाहन नागोराव चव्हाण यांनी केलं आहे.

दरम्यान, जीबीएस बाधित रुग्णसंख्येत २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३४, ० ते ९ वयोगटातील २२, ५५ ते ५९ वयोगटातील २५ रुग्ण, १० ते १९ वयोगटातील २१ रुग्ण, ६० ते ६० वयोगटातील १४ रुग्ण, ७० ते ६९ वयोगटातील १ रुग्ण आणि ८० ते ८९ वयोगटातील २ रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का

Manikrao Kokate : ... तर आज कोकाटेंचा सेंडऑफ, रोहित पवारांची बोचरी टीका

Ankita Walawalkar : कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर संतापली; म्हणाली- "गेटवर नाव महाराजांचं,पण..."

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

SCROLL FOR NEXT