Pune Police Saam Tv
महाराष्ट्र

अहमदनगरमध्ये खळबळ! आठ गावठी कट्टे जप्त, पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून धापेमारी करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर : श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असल्याचं समोर आलं आहे. श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीला (Shrirampur crime) आळा घालण्यासाठी पोलिसांकडून धापेमारी करण्यात आली. यावेळी पोलिसांना येथील एका पेट्रोल पंप परिसरात गावठी कट्टे बनविणाऱ्यांचा अड्डा असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर सदर ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून गावठी कट्टे बनवणाऱ्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी या धडक कारवाईत तीन आरोपींना अटक (Three culprit arrested) केले असून त्यांच्याकडून आठ गावठी कट्टे जप्त केले आहेत. राहुल सिंग कलानी,आकाश सिंग जुनी व अक्षय सिंग कलानी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अहमदनगरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एलसीबी पथकाने कारवाई करून एकाचवेळी आठ गावठी कट्टे जप्त केले आहेत. श्रीरामपूर शहरातील एका पेट्रोल पंप परिसरात पोलिसांनी छापेमारी करत गावठी कट्टे बनविणाऱ्यांचा अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या गुन्ह्यात इतर काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे. जेरबंद केलेल्या आरोपींचा मध्ये प्रदेश येथे कनेक्शन आहे का ? याचाही छडा पोलीस लावत असून तपासाची सूत्र वेगानं फिरवली असल्याचं समजते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sonu Nigam: मार खाण्याची कामं का करता? सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये चाहता अचानक स्टेजवर चढला; कोल्हापूरमध्ये गायकासोबत काय घडलं?

Shukra Gochar 2026: पुष्य नक्षत्रामध्ये शुक्राचं गोचर; 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार

Rava Ladoo: घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा रव्याचा लाडू; तोंडात टाकताच विरघळेल

Pune News: धावत्या बससमोर उडी मारून एकाची आत्महत्या, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT