Abdul Sattar Controversy  saam tv
महाराष्ट्र

Abdul Sattar Controversy : मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात संताप; औरंगाबादच्या घरावर दगडफेक

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्री सत्तारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. सत्तारांच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर परिसरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Abdul sattar Latest News : मंत्री अब्दुल सत्तार हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याने ते नव्या वादात सापडले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्या मुंबईतील घराच्या अज्ञातांनी काचा फोडल्या. त्यानंतर आता सत्तारांच्या औरंगाबाद शहारातील मंत्री अब्दुल सत्तारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्री सत्तारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. सत्तारांच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर परिसरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्तारांवर टीकेचा भाडीमार होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात सत्तारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. सत्तारांच्या मुंबईतील घरातील काच्या फोडल्या आहेत. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद शहरात कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्र्यांच्या घरावर ही दगडफेक करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातात खोके घेऊन सत्तारांच्या घरासमोर आंदोलन देखील केले आहे.

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल

मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष एडवोकेट इंद्रपाल सिंग यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निवेदन दिले आहे.

यावेळी आंदोलन करताना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. पोलिसांनी जर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार नोंदवून कार्यवाही नाही केली, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Nasrapur Case : नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी दोषी, सोमवारी कोर्ट शिक्षा सुनावणार

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

SCROLL FOR NEXT