Agricultural Produce Import Duty  Saam Digital
महाराष्ट्र

Agricultural Produce Import Duty : कृषी मालावरील आयात शुल्कात मोठी घट; शेतकऱ्यांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Import Duty : दूध पावडर, मका, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलावरील आयात शुल्कात घट करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळ, पाणीटंचाई आणि अवेळी पाऊस यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

Sandeep Gawade

देशात एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच दूध पावडर, मका, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलावरील आयात शुल्कात घट झाली आहे. आयात शुल्क घटल्याने विदेशी मालाची देशात मोठ्याप्रमाणात आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशातील दूध सोयाबिन, मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

सध्या दुष्काळ, पाणीटंचाई आणि अवेळी पाऊस यामुळे कांदा, टोमॅटो आणि दूध उत्पादकांसह इतर पिके घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याच्या दरातील अनिश्चितता आणि सरकारी धोरणांमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणुकांआधी कांद्यावरवर निर्यात बंदी घातली होती. त्यांनतर निवडणुका जवळ येताच ही बंदी उठवण्यात आली. निवडणूक प्रचारातही हा मुद्दा गाजला होता. आता निवडणुका संपल्या. केंद्रात नवं सरकार स्थापन झालं. मात्र त्यासोबत कृषी मालावरील आयात शुल्कातही घट झाली आहे.

दरम्यान गायीच्या दूधाच्या दरातही कपात करण्यात आली आहे. दुधाच्या दरावरील कपातीविरोधात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यात आता आयात शुल्कात घट होणार आहे. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी भारतीय बाजारपेठ मोठ्या प्रमाणात खुली होणार आहे. त्याचा परिणार भारतीय दुग्धजन्य पदार्थांच्या दरावर होणार आहे. साहजिकच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

सरकारने कच्चे सोयातेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे पामतेलाच्या आयात शुल्क मार्च २०२४ पर्यंत ५.५ टक्के केले होते. तर रिफाईंड सोयातेल, सूर्यफूल आणि रिफाईंड पामतेल आयात शुल्क १३.७ टक्के ठेवले होते. यावरील आयात शुल्क वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. मात्र सरकारने मात्र आयातशुल्क मार्च २०२५ पर्यंत कायम ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT