Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! प्रेम भंग झाल्यानंतर स्वत:च्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवत उचललं टोकाचं पाऊल

आत्महत्येपूर्वी सुशांत याने आपल्या मोबाईलवर व्हॉटसअॅप स्टेटसला प्रेम भंगचा व्हिडीओ रील ठेवला.

विजय पाटील

सांगली - आधी प्रेम विराहाचा व्हिडीओ नंतर स्वतःच्या श्रद्धांजलीचा फोटो मोबाइलला स्टेटस ठेवून सांगलीतील (Sangli) वाळवा येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशांत तोडके असं मृत तरुणाचं नाव असून वाळवा येथे एका शेतामध्ये असणाऱ्या गोठ्यात त्याने गळफास घेऊन ही आत्महत्या केली आहे. खेड रस्त्यावर असणाऱ्या एका शेतात सुशांत भरत तोडके वय २६ राहणार पलूस तालुक्यातील नागठाणे हा शेतमजूर म्हणून काम करत होता. काल सुशांतने काम करत असलेल्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, आत्महत्येपूर्वी सुशांत याने आपल्या मोबाईलवर व्हॉटसअॅप स्टेटसला प्रेम भंगचा व्हिडीओ रील ठेवला. जो कोणाला तरी उद्देशून होता. त्याच्या अर्ध्या तासानंतर त्याने स्वतःचा फोटो आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मजुकर असणारा स्टेटस ठेवत काही वेळाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुशांत याचे व्हॉटसपचे स्टेट्स पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तो भाड्याने राहत असलेल्या घर मालकाला फोन वरून सुशांतचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर घर मालक इशान गावडे यांनी सुशांत ज्या शेतात काम करत होता त्याठिकाणी जाऊन पाहिले असता गोठ्यात सुशांत याचा मृतदेह लटकत असल्याचे समोर आले. सदर घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT