चंद्रकांत पाटील राज ठाकरेंना भेटल्याने अमित शहांनी पाटलांची भेट टाळली? (व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील राज ठाकरेंना भेटल्याने अमित शहांनी पाटलांची भेट टाळली? (व्हिडिओ)

मनसे भाजप युतीबाबत प्रश्नचिन्ह उभा झाला आहे. कारण दिल्ली दौऱ्यावर असलेले चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भेट नाकारलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मनसे MNS भाजप BJP युतीबाबत प्रश्नचिन्ह उभा झाला आहे. कारण दिल्ली दौऱ्यावर असलेले चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह Amit Shah यांनी भेट नाकारलेली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे भाजप युतीच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या दिल्लीमध्ये भेटीत मनसे भाजप युतीत बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यातच अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट टाळल्यामुळे मनसे भाजप युतीची शक्यता मावळाल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ज्या पद्धतीने संकेत दिले होते, त्यांनी घरी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांच्या दिल्ली दौरा देखील झाला होता. परंतु या दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांची भेट अमित शाहनबरोबर झाली नाही.

अमित शाह-चंद्रकांत पाटील यांची भेट नाहीच;

चंद्रकांत पाटील हे दिल्लीत Delhi अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र दिल्लीत ही भेट झालीच नाही. केवळ देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचीच भेट झाल्याची माहिती आहे.

अमित शाह यांच्यासोबत भेट न झाल्यामुळे भाजपच्या वर्तुळात सुरु आहे की, ज्यापद्धतीने राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली त्याचा मनसे भाजप युतीबाबत त्यामुळे यासर्वबाबत नाराजी आहे.

दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत युती बद्दल भेट न झाल्यामुळे मुंबई महापालिकेसाठी होईल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT