Murlidhar Jadhav Blame On Sushma Andhare Saam Digital
महाराष्ट्र

Murlidhar Jadhav Blame On Sushma Andhare: सुषमा अंधारे, सुजित मिणचेकर यांच्या कटकारस्थानाचा मी बळी, मुरलीधर जाधवांना अश्रू अनावर

Murlidhar Jadhav Blame On Andhare News: उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार सुजित मिणचेकर, उपनेत्या सुषमा अंधारे आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांच्या कटकारस्थानाचा मी बळी ठरल्याचा आरोप मावळते जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी दिलेली आहे.

Sandeep Gawade

Murlidhar Jadhav Blame On Andhare

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार सुजित मिंचेकर, उपनेत्या सुषमा अंधारे आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांच्या कटकारस्थानाचा मी बळी ठरल्याचा आरोप मावळते जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी दिलेली आहे. यावेळी मुरलीधर जाधव यांनी अश्रू अनावर झाले होते. 3 दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका मुरलीधर जाधव घेतली. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान मुरलीधीर जाधव यांनी पक्षातीलच नेत्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

3 दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट अन्य दुसऱ्या कारणांसाठी नसून ती लोकसभेच्या निवडणुकीसाठीच होती. गेली 25 वर्ष मी शिवसेनेसाठी दिवस-रात्र एक केलेला आहे. त्यामुळे मला उमेदवारी मिळावी ही माझी अपेक्षा होती. पण ही मागणी करताच दुसऱ्या दिवशी माझी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही हकालपट्टी करण्यात माजी आमदार सुजित मिंचेकर, सुषमा अंधारे आणि अरुण बुधवाडकर यांनी केल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत केलेला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

5 स्टार MIDC मध्ये 67 एकरचा घोटाळा

आपल्यावर अन्याय झाला असून उद्धव ठाकरे यांनी यापुढे तरी असा अन्याय कोणत्याही शिवसैनिकांसोबत करू नये अशी विनंती ही त्यांनी केलेली आहे. शिवसेना पक्ष अडचणीत असताना आणि मधल्या काळात एफिडेट दाखल करत असताना डॉक्टर सुजित मिंचेकर आणि सध्या नियुक्त करण्यात आलेले जिल्हाध्यक्ष यांनी अद्यापही ऍफिडेट केलेले नाही. त्यामुळे हे पक्ष्यांसोबत किती निष्ठावंत आहेत हे कळतं. सुजित मिनचेकर यांनी कोल्हापुरातील 5 स्टार MIDC मध्ये 67 एकरचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

SCROLL FOR NEXT