Swine Flu News Saam TV
महाराष्ट्र

Swine Flu: नागपूरात कोरोना पाठोपाठ आता 'स्वाईन फ्लू'चा धोका

नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची सख्या वाढत असतानाच आता 'स्वाईन फ्लू' ने डोके वर काढले आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपूरमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची सख्या वाढत असतानाच आता 'स्वाइन फ्लू' ने डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून नागपुरात ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत आहे. अशातच आता ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढल्याने नागपूरकरांचा (Nagpur) धोका वाढला आहे.

शहरात सध्या 'स्वाईन फ्लू'चे २० रुग्ण असून त्यापैकी आठ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच सर्वाधिक ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील असल्याचं आढळून येत आहे.

पाहा व्हिडीओ -

त्यामुळे नागपूरात कोविड पाठोपाठ आता 'स्वाईन फ्लू'चा (Swine Flu) धोका उद्धभवला असून नागपुरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, २४ तासात कोरोनाचे २९१ आढळले असून दोघांचा मृत्यु झाला आहे.

कोरोना आणि आता 'स्वाईन फ्लू'चे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंताही वाढली आहे. त्यामुळे नागपुरकरातील नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : धगधगता ज्वालामुखी ते विषारी सापांचा सुळसुळाट, जगातील ७ धोकादायक ठिकाणे

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT