Latur News SAAM TV
महाराष्ट्र

Latur News: प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा केला मात्र वेळेत राष्ट्रध्वज उतरवला नाही; आरोग्य सेविकेवर गुन्हा दाखल

वेळेवर राष्ट्रध्वज उतरवला नाही म्हणून आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

दीपक क्षीरसागर

Latur News: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे शिरोळ वांजरवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते.परंतु वेळेवर राष्ट्रध्वज उतरवला नाही म्हणून आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Latur News)

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नवाज चाँदपाशा तांबोळी यांनी तक्रार दिली आहे.ते संध्याकाळी 7 वाजता शेतातून घराकडे परत जात असताना शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रध्वज उतरवला नसल्याचे दिसून आले.आरोग्य सेविका अरुणा सूर्यकांत राठोड यांना त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून राष्ट्रध्वज उतरवला नसल्याचे सांगितले.

त्यांनी आशा कार्यकर्ती मुक्ताबाई बाळासाहेब जाधव यांना राष्ट्रध्वज उतरवण्यास सांगितल्याचे सांगून फोन ठेवून दिला.त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना आणि पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी येळेकर यांच्या हस्ते रात्री 9.30 वाजता राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवण्यात आला. राष्ट्रध्वज वेळेत उतरवला नाही म्हणून वैद्यकीय अधिकारी येळेकर आणि आरोग्य सेविका अरुणा सूर्यकांत राठोड यांच्याविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Parenting Alert : लहान मुलांच्या घशात काही अडकलं तर सर्वात आधी काय करावे? प्रत्येक पालकाला माहित असाव्यात 'या' २ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT