Aaditya Thackeray Car Accident Saam Tv
महाराष्ट्र

Sindhudurg: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या वाहनाला मंगळवारी आज जोरदार अपघात (Accident) झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग: राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या वाहनाला मंगळवारी आज जोरदार अपघात (Accident) झाला आहे. आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. मंत्री आदित्य ठाकरे हे सुखरुप असून त्यांच्या ताफ्यात वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मुंबई- गोवा (Mumbai-Goa) महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळ हा अपघात घडला आहे.

हे देखील पहा-

ताफ्यातील २-३ वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणती देखील जीवितहानी झाली नसून आदित्य ठाकरे हे सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मंत्री आदित्य ठाकरे हे आपल्या नियोजीत दौऱ्यानुसार सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथून रत्नागिरीला निघाले होते. या वेळी खारेपाटण येथे सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला आहे.

प्रोटोकॉलनुसार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. दरम्यान, ताफ्यातील एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात घडला आहे. दरम्यान, या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुरक्षीत आहेत, अशी माहिती समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बनावट आधारकार्डावर बालविवाहाचा प्रयत्न फसला; मांडव सजला, पाहुणे जमले, तेवढ्यात 'चाईल्डलाईन'ने असा उधळला डाव

Maharashtra Live News Update: : नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळीने झोडपले

भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये मोठं घबाड, SIT च्या हाती लागले महत्वाचे पुरावे, VIDEO

Shocking : बाई, काय हा प्रकार... पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी तरुणाने देवीला घातलं साकडं; नवस पूर्ण होताच काय केलं? वाचा

Maharashtra Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT