aditi tatkare 
महाराष्ट्र

महिलांसाठी काेविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयाेजन : तटकरे

साम टिव्ही ब्युरो

- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व महिलांसाठी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून काेविड १९ प्रतिंबधक लसीकरणाची विशेष मोहिम आखल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. येत्या सोमवारी (ता .११) जिल्ह्यात ही माेहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते नियोजन करावे असे आदेश दिल्याचे तटकरे यांनी नमूद केले. aditi-tatkare-decleares-covid19-vaccination-drive-for-women-on-11-october-in-raigad-sml80

काेविड १९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी तसेच महिलांचे काेविड १९ प्रतिबंधक लसीकरण पुर्ण व्हावे यासाठी ही विशेष मोहीम राबविण्याचा निर्धार केल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.

तटकरे म्हणाल्या रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी काेविड १९ लसीकरण केंद्रावर येत्या सोमवारी (ता ११) महिलांचे लसीकरण केले जाईल. महिलांचे जीवन अधिक सुरक्षित करणे व त्यांचे लसीकरणाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने हि मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील महिलांनी या मोहिमेचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा, जेणे करून आपली व आपल्या कुटूंबाचे आरोग्य सुरक्षित राखण्यास मदत होईल असेही तटकरे यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT