Actress Prajakta Mali 
महाराष्ट्र

Prajakta Mali: सुरेश धस यांच्या विधान प्रकरणी प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री फडणवीसांकडे काय केली विनंती?

Actress Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरेश धस यांनी केलेल्या विधानावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एक विनंती केलीय. तसेच धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही अभिनेत्रीने केलीय.

Bharat Jadhav

आमदार सुरेश धस यांनी ज्याप्रकारे आपलं नाव घेतलं त्यामुळे आपली प्रतिमा डागळली आहे. धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत केली. त्याचवेळी प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक विनंती केलीय. ज्या गोष्टींचा पुरावा नाही, त्या गोष्टींची बातमी करू नये, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी विनंती प्राजक्ता माळीने केलीय.

बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून टीका करताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या टिप्पणी केली होती. त्याला उत्तर देताना प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली. सरपंच हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचं सुरेश धस म्हणाले. त्यावेळी धस यांनी प्राजक्ता माळीसह इतर महिला कलाकारांची नावं घेतली होती. धस यांनी ज्याप्रकारे नाव घेतलं त्यावरून महिला कलाकाराची प्रतिमा मलीन होते. एखादा लोक प्रतिनिधी, असं विधान करत असेल तर त्यांचे लाखो कार्यकर्ते आणि समर्थक तसेच विचारधारा पुढे नेतात.

मग राजकारणी तेच वाक्यावर शिक्कामोर्तब करतात. माझ्याबाबत केलेलं विधान चुकीचं आहे, त्याचा निषेध करते, असं प्राजक्त माळी म्हणाली. गेल्या दीड महिन्यांपासून खोट्या गोष्टीवर आपल्यावर टीका केली जातेय. हे आपण अत्यंत शांततेने, ट्रोलिंग, निगेटिव्ह कमेंट्सना सामोरे जातेय. खोटी बाब असल्यानं आपण शांत होतो. परंतु ते आमच्यावर बेतलंय, माझ्या कुटुंबियांना त्याचा त्रास होतोय. माझ्या आईला रात्रीची झोप नाही. वाईट प्रतिक्रियावरून भाऊने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिलीट केली आहेत. असं प्राजक्ताने सांगितलं.

माध्यमेही कोणत्याही गोष्टीचा पुरवा नसताना बातम्या चालवतात. त्यामुळे समोरील व्यक्तीवर परिणाम होतो. समोरील व्यक्तीच्या मनाला काय वाटत असेल? बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्याप्रकरणाशी माझा संबंध जोडण्यात आला. राजकारणी लोक त्यांच्या फायद्यासाठी चित्रपटातील महिला कलाकार हे सॉफ्ट टार्गेट असतात. कोणीही येत आणि त्यांची नावे घेऊन जातात. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी महिलांच्या नावांचे गैरवापर करणं बंद करावं, अशी विनंतीही प्राजक्ता माळीने केली.

मुख्यमंत्र्यांकडे काय केली विनंती?

राजकीय गोष्टींसाठी चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांच्या नावांचा गैरउपयोग केला जात असेल. ते होता कामा नये. याप्रकरणी आपण महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. आपणही याविरोधात कायदेशीरपणे लढत राहील. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपली विनंती आहे, की त्यांनी याबाबत ठोस करावी करावी. आधारहीन गोष्टींचा ज्याचा कोणताही पुरवा नाही, त्याची बातमी करू नये. तसे त्यांनी आदेश द्यावेत, अशी विनंती प्राजक्ताने केलीय.

धस यांनी माफी मागावी- प्राजक्ता माळी

ज्या कुत्सितपणे सुरेश धस यांनी विधान केलं, हे फक्त हश्या पिकवण्यासाठी केलंय. ही निंदणीय बाब आहे. त्यामुळेच ज्यापद्धतीने त्यांनी टीका केलीय, आणि हश्या पिकावलाय. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं आणि काय बोलावं.याचं ज्यांना भान नाहीये, त्यांना मी विनंती करते, त्यांनी तितक्याच विम्रनपणे माझी जाहीर माफी मागावी. ज्या ज्या महिला कलाकरांची नावे त्यांनी घेतली आहेत. त्यांची सर्वांची त्यांनी माफी मागावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंचरच्या रास्तारोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक; नाफेड खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी

लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT