Gautami Kapoor Saam
महाराष्ट्र

'मी तुला सेक्स टॉय गिफ्ट दिलं तर?' अभिनेत्रीने आपल्या लेकीला १६ व्या वर्षी नेमकं कोणतं गिफ्ट दिलं? | Gautami Kapoor

Actress Gautami Kapoor: टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूर सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या मुलीला १६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेक्स टॉय किंवा व्हायब्रेटर भेट देण्याचा विचार केला होता.

Bhagyashree Kamble

टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूर सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ‘हॉटरफ्लाय’ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने कबूल केले की, तिने आपल्या मुलीला १६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेक्स टॉय किंवा व्हायब्रेटर भेट देण्याचा विचार केला होता. या विधानामुळे तिला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली, 'जेव्हा माझी मुलगी १६ वर्षांची झाली होती. तेव्हा मला तिला काहीतरी भेटवस्तू द्यायची होती. मी काय भेटवस्तू देऊ? याचा मी विचार करत होते.

तिला सेक्स टॉय, व्हायब्रेटर किंवा दुसरे काही देता येईल का? असा विचार मनात आला', असं गौतमीने आपल्या मुलाखतीत सांगितलं.

'माझी मुलगी जेव्हा १६ वर्षांची झाली. तेव्हा तिला सेक्स टॉय किंवा व्हायब्रेटर भेट म्हणून देण्याचा विचार केला होता. मी तिच्याशी यासंदर्भात चर्चाही केली होती. जेव्हा मी या भेटवस्तूविषयी मुद्दा मांडला तेव्हा 'आई वेडी आहेस का तू?' असं मला ती म्हणाली. पण मी तिला यावर विचार करायला सांगितलं', असं गौतमी म्हणाली.

'किती तरी आई आपल्या मुलींसोबत याविषयी चर्चा करीत नसतील. बहुतांश आई आपल्या मुलींशी या विषयावर बोलण्यास तयार नसतील, पण आपण आपल्या मुलीसोबत या गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं आहे', गौतमीने आपलं मत स्पष्ट केलं.

'माझ्या आईने जे माझ्यासाठी केले नाही. ते सर्वकाही माझ्या मुलीसाठी करायचं आहे. अनेक महिला आयुष्यातून खरा आनंद अनुभवल्याशिवाय जगातून निरोप घेतात. अशा स्थितीत आपण का जगावे? आज माझी मुलगी १९ वर्षांची झाली आहे. माझी लेक माझा आदर करते. पण तिने सर्व काही अनुभवावे अशी माझी इच्छा आहे' असं गौतमीने आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT