satara, udayanraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मंत्री शंभूराज देसाईंच्या बंगल्यानजीक घेतलं ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाेसले यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाढदिवसा निमित्त भितींवर उदयनराजेंचे चित्र काढले जात आहे.

Siddharth Latkar

Satara : साताऱ्यातील (satara) पाेवई नाका येथून खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest news) यांच्या कार्यकर्त्यांना सातारा पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका इमारतीवर उदयनराजे भाेसले यांचे पेटींग काढण्याचे काम सुरु हाेते. त्यास लाेकप्रतिनिधींचा विराेध असल्याने पाेलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचे समजते.

राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमाेरील एका इमारतीच्या भितींवर खासदार उदयनराजे भाेसले यांचे छायाचित्र काढण्याचे काम सुरु करण्यात आले हाेते. या कामास लाेकप्रतिनिधींचा विराेध असल्याची चर्चा हाेती. त्यातूनच घटनास्थळी पाेलिसांचा काही दिवसांपासून येथे बंदाेबस्त हाेता.

आज सकाळी या ठिकाणी पुन्हा काम सुरु करण्यात आले. सातारा पोलिसांनी या ठिकाणी काम करता येणार नाही असे कार्यकर्त्यांना आणि पेंटरला सुनावलं. परंतु उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी त्यास विराेध दर्शविला आणि काम सुरु ठेवले. काही वेळानंतर पाेलिसांनी उदयनराजेंच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trekking Forts : लोहगड-कलावंतीण दुर्गच नव्हे, महाराष्ट्रातील 'हे' ५ किल्लेही देतात भन्नाट ट्रेकिंग अनुभव

Maharashtra News Live Update: ठाण्यात मध्यरात्री जीवघेण्या स्टंटचा थरार!

Back Pain: रोज पाठ दुखते, बाम लावून दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या 'ही' ७ कारणं असू शकतात जबाबदार

Tuesday Horoscope: आज या राशींच्या आयुष्यात घडणार महत्त्वाचे बदल; वाचा राशीभविष्य

Salt Water Cleaning: मिठाच्या पाण्याने लादी पुसण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT