बीडमध्ये बंद पडलेल्या अतिथी बारवर छापा; 92 हजारांचा मुद्देमाल जप्त विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये बंद पडलेल्या अतिथी बारवर छापा; 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस आणि राज्यउत्पादन शुल्कची संयुक्त कारवाई.

विनोद जिरे

बीड : बीड शहरातील बसस्थानक परिसरामध्ये असणाऱ्या, हॉटेल अतिथी बारवर, बीड (Beed) पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला आहे. हॉटेल अतिथी बारचा सध्याचा परवाना बंद असतानाही, हॉटेलमध्ये खुलेआम दारू (Alcohol) विक्री सुरू होती. ही माहिती मिळल्यावरून रात्री 11 वाजता, एसीपी (ACP) पंकज कुमावत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांनी, टीमसह हॉटेल अतिथीवर छापा टाकला आहे.

हे देखील पहा-

यावेळी अवैधपणे विकल्या जाणाऱ्या देशी- विदेशी दारुसह, बियरचे बॉक्स अशी एकूण 91 हजार 765 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. यावेळी गौस सत्तार पठाण (वय- 39) रा. बालेपीर बीड याला अटक (Arrested) केली असून मुख्य आरोपी निखिल सुरेंद्र जयस्वाल याचा पोलीस (Police) शोध घेत आहे.

दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र (Maharashtra) दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक रमेश घोरपडे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT