उपसरपंच चोरत होता गावाची वीज; महावितरणाची कारवाई Saam Tv
महाराष्ट्र

उपसरपंच चोरत होता गावाची वीज; महावितरणाची कारवाई

उपसरपंच हेमराज कापसे हे आपल्या शेतीच्या कामात विज चोरी करतांना आढळून आले आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : जेव्हा गावाचा उपसरपंच हा वीज चोरी करतात तेव्हा! होय ऐकून आश्चर्य झाले न पण हे खरे आहे. ही घटना धक्कादायक घटना भंडारा Bhandara जिल्ह्याच्या लाखनी Lakhni तालुक्यामधील पालांदुर Palandur ह्या गावात महावितरणच्या पथकाच्या धाड़ीत चक्क पालांदूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच हेमराज कापसे हे आपल्या शेतीच्या कामात विज चोरी करतांना आढळून आले आहे.

शहर आणि ग्रामीण Rural भागामध्ये वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात वीज चोरीचे Power theft प्रकार सर्वात जास्त आढळून येत असल्याने, महावितरणाच्या भरारी पथकाद्वारे या गोष्टीला आळा घालण्यासाठी विज चोरी शोध मोहिम सूरु आहे.

हे देखील पहा -

काल भंडारा महावितरणाच्या भरारी पथकाने पालांदूर गावात भेट दिली होती. तेव्हा लाखनी तालुक्यातील पालांदूर गावातील उपसरपंच हेमराज कापसे यांनी आपल्या शेतातील बोरवेल सुरू करण्यासाठी, विद्युत तारेवर आकडा टाकून वीज चोरी करत असल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.

लगेच कारवाई करत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तो आकडा काढून ताब्यात घेतला आहे. उपसरपंचावर कारवाईचे सत्र देखील सुरु केले आहे. जर गावातील लोकसेवकच विज चोरी करत असेल, तर गावापुढे काय आदर्श पडेल हाच प्रश्न शेवटी उभा ठाकला आहे. तर महावितरणाच्या २००३ कायद्यानुसार विज चोरी प्रकरणात १६ हजार रुपये दंड आणि १ वर्षाच्या कारावासाची शिक्षेचे प्रावधान आहे. यामुळे आता ह्या प्रकरणात उपसरपंचावर काय कारवाई होते हे बघने महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT