आयकर विभागाच्या पथकाची नांदेड मध्ये कारवाई; बुलढाणा बॅंकेच्या संचालकांची चौकशी संतोष जोशी
महाराष्ट्र

आयकर विभागाची नांदेड मध्ये कारवाई; बुलढाणा बॅंकेच्या संचालकांची चौकशी

नांदेड मध्ये प्रसिद्ध व्यापारी आणि बुलढाणा बॅंकेचे संचालक सुबोध काकाणी यांच्या व्यवस्थानांवर आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड मध्ये प्रसिद्ध व्यापारी आणि बुलढाणा बॅंकेचे संचालक सुबोध काकाणी यांच्या व्यवस्थानांवर आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. आज पहाटे पासून काकाणी यांच्या धर्माबाद येथील वेअरहाऊस, कोल्डस्टोरेज, शाळा,घर, कार्यालयावर आयकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील पहा :

जवळपास तीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह छापा टाकून काकाणी यांच्या जवळील बेहिशोबी मालमत्तेची तपासणी केली. अशोक चव्हाण यांच्या चार कारखान्यांना बुलढाणा अर्बन बॅंकेने दिलेल्या कर्जप्रकरणात काकाणींची भुमिका महत्वाची असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, आयकर विभागाने बुलढाणा अर्बन बँकाच्या संचालकांची तिसऱ्या दिवशी ही सुरुच ठेवली आहे. या कारवाईमुळे धर्माबाद परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

Amravati : पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास नकार, नातेवाईक संतप्त

Mumbai Fire : आधी धूर, नंतर आगीचा वेढा; घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या बर्गर शॉपला भीषण आग

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

Home Wall Colour: वास्तुशास्त्रानुसार घराच्या भितींना कोणता रंग द्यावा?

SCROLL FOR NEXT