Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

दारूच्या नशेत 'त्या' श्वानाची हत्या; तरुणाशी झालेल्या वादाचा काढला राग

देवळी पोलिसांनी नागपुरातून केली आरोपीला अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

वर्धा - देवळी शहरातील ठाकरे चौकात एका माथेफिरुने चक्क श्वानाच्या पोटात चाकू भोसकून हत्या केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच परिसरात चांगलीच खळबळ माजली होती. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला नागपुरातून अटक केली आहे. या माथेफीरू आरोपीने दारूच्या नशेत एका व्यक्तीशी झालेल्या वादाचा राग श्वानावर चाकूने वार करून काढला असल्याची माहिती आहे. देवळी पोलिसांनी माथेफिरुविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हे देखील पाहा-

अक्षय मडावी असं आरोपीच नाव आहे. पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच २१ ऑगस्ट रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवळी शहरातील ठाकरे चौकात या माथेफिरुने चांगलाच हैदोस घातला होता. दारूच्या नशेत हातात खुलेआम चाकू घेऊन तो परिसरात वावरत होता.

त्या माथेफिरुने चक्क एका गर्भवती श्वानाच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन निर्दयतेने हत्या केली होती. हा घटनाक्रम परिसरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला नागपुरातून अटक केली आहे.

आरोपीला या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती मिळताच त्याने गावातून पळ काढला होता. देवळी पोलिसांना तो नागपुरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला नागपूर येथे सुरु असलेल्या ताज्जूदीन बाबाच्या उर्स मधून ताब्यात घेतले. आज या आरोपीला पोलिसांकडून न्यायलयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT