अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास! Saam Tv
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास!

यवतमाळमधील आर्णी येथे २०१७ साली आरोपीने तरुणीवर अत्याचार केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ - अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला. शेख शारीक शेख रहिम (वय 25,रा. कळंब चौक), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहा फेब्रुवारी 2017 रोजी सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी कॉलेजला गेली असता, तिला जबरदस्तीने आर्णी येथे उर्स बघण्याच्या उद्देशाने आरोपी घेऊन गेला.

हे देखील पहा :

वाहन पार्कींगमध्ये नेऊन त्याने या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यानंतर नागपूर येथे तिला नेण्यात आले. दोघेही नागपूर येथील बसस्थानकावर उतरले असता, त्यांना या तरुणीच्या चुलत बहिण व वहिनीने पोलिसांच्या मदतीने पकडले. यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात आणून या तरुणाविरुद्घ गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हे प्रकरण प्रकरण न्यायप्रविष्ट होते. यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. कलम 4 बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याप्रमाणे दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम 363 भांदवीअंतर्गत दोन वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी काम पाहिले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Tourism : कसारा घाटाजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंग करताना दिसतो कळसूबाई शिखराचा सुंदर नजारा

SCROLL FOR NEXT