Crime Saam TV
महाराष्ट्र

महिलांच्या छेडछाडी प्रकरणी ५ गुन्हे असणाऱ्या नराधमाचा ७ वर्षीय मुलीवर बलात्कार

सात वर्षीय मुलगी वडापावच्या दुकानात आली असता नराधन आरोपीने गोड गोड बोलून मुलीला तेथून घेऊन गेला.

जयश्री मोरे

मुंबई : महिला आणि लहान मुलींवर तब्बल पाच वेळा छेडछाड आणि अत्याचार करणाऱ्या आरोपीला एक सात वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याच्यार करण्याच्या गुन्ह्यामध्ये घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar Police) २४ तासांच्या आत अटक केली आहे.

सचिन अनंत शामा असे या ३५ वर्षीय नराधमाचे नाव आहे. घाटकोपरच्या आनंदनगर विभागात पीडित सात वर्षीय मुलगी वडापावच्या दुकानात आली असता नराधन आरोपीने गोड गोड बोलून मुलीला तेथून घेऊन गेला. सुमारे एक ते दीड किमी एका निर्मनुष्य झाडी असलेल्या ठिकाणी तिला नेऊन तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पळ काढला. दरम्यान, काही वेळाने त्या ठिकाणी काही नागरिकांनी त्या मुलीला पाहिल्यावर त्यांनी पोलीस आणि तिच्या नातेवाईकांना कळविले.

पोलिसांनी (Police) तात्काळ या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आणि या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला असून या प्रकरणी पोलिसांनी आठ टीम तयार करून विभागातील सर्व विभागातील सीसीटीव्ही तपासून काढले असता पोलिसांना आरोपीचे चित्र मिळाले.

सचिन शामा हा घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट पोलीस ठाण्यात पाच अशाच प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असून कोविड काळात कोठडीतून बाहेर आल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ भिवंडी येथे सापळा रचून त्याला २४ तासांच्या आत अटक केली आहे.या प्रकरणी घाटकोपर पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती परीमंडळ सात चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT