मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन केली हत्या; आरोपी पती-पत्नी गजाआड Saam tv
महाराष्ट्र

मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन केली हत्या; आरोपी पती-पत्नी गजाआड

गोवंडीच्या शिवाजी परिसरात राहणारे अब्दुल खलील शेख (वय ६९) असे यातील मयत इसमाचे नाव आहे.

जयश्री मोरे

मानखुर्द : पोटच्या मुलीला छेडल्याच्या संशयातून पती-पत्नीने घरात काम करणाऱ्या वृद्ध नोकराची हत्या केल्याची घटना रविवारी मुलुंड येथे घडली होती. मानखुर्द पोलिसांनी (Mankhurd Police) तपास करत, अवघ्या काही तासात आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे. अब्दुल खलील शेख असं मृतकच नाव आहे. गोवंडीच्या शिवाजी परिसरात राहणारे अब्दुल खलील शेख (वय ६९) असे यातील मयत इसमाचे नाव आहे. ते ओळख असलेल्या मुलुंड येथील रहिवासी सलिम अख्तर (वय ३८) या आरोपीच्या घरी जेवण तयार करण्याचे काम करत होते.

मात्र शनिवारी मध्यरात्री आरोपी याने अब्दुल खलील शेख यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी यांच्या १२ वर्षाच्या मुलीला छेडल्याच्या संशयातून त्याने ही मारहाण केली. यामध्ये शेख गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आरोपी पती-पत्नीने शेख यांना गंभीर अवस्थेत मध्यरात्री मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर सोडून दिले.

रविवारी सकाळी शेख यांचा मृतदेह काही रहिवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ ही माहिती मानखुर्द पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मयत इसमाची ओळख पटवून गुन्हा दाखल केला. आरोपी शोधण्यासाठी मानखुर्द पोलिसांनी 5 पथक तयार केली तसेच तांत्रिक बाबी, सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मार्फत व मृतकचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल केला आणि त्यातून मृतकाचे नातेवाईक मानखुर्द पोलीस ठाण्यात पोहचले त्यांनी दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी तत्काळ मुलुंड येथे आरोपीच्या घरी दोन पथक पाठवले. मात्र आरोपीने पत्नी आणि मुलांसह घरातून पळ काढला होता. आरोपी पटना येथे जाण्याच्या तयारीत होते. मानखुर्द पोलिसांना याची माहिती मिळताच पत्नी फिरोजा जाफर (वय ३५) हिच्यासह चेंबूर येथून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक खाडे यांनी दिली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha: विनोद तावडे की धैर्यशील पाटील? राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरणार

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

धक्कादायक! दूध पिऊन ४ जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

Aditya Pancholi: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार? २ आठवड्यांनी कोर्टात होणार सुनावणी

March Holiday 2026 : मार्च महिन्यात किती सुट्ट्या अन् कुठले सण असणार? संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT