धक्कादायक! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्या

नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरच्या पाचपावली भागात ही घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर - नागपूरमध्ये Nagpur एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या Murder केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरच्या पाचपावली भागात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस Police घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान घटनेमुळे पाचपावली परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी हा टेलरिंगचे काम करीत होता. गोळीबार चौकात तो भाड्याच्या खोलीत राहत असे. Accused commits suicide by killing 5 members of the family

हे देखील पहा -

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर या आरोपीने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह सासू आणि मेहुणीची हत्या केली आहे. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून मारले तर पत्नी, मुलगी आणि मुलाची डोक्यावर हातोड्याने फटके मारून हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला.

कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन तो पुन्हा आपल्या घरी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन आलोक माथुरकर याने आपले जीवन संपवले. कौटुंबिक वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. Accused commits suicide by killing 5 members of the family

रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह आपल्या ताब्यात घेतले आहे. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT