Yawatmal Crime News Saam TV
महाराष्ट्र

Yawatmal Crime News: लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर 4 वर्षांपासून लैंगिक शोषण, आरोपीला अटक

यवतमाळात एका 25 वर्षीय मुलीवर गेल्या 4 वर्षांपासून सतत लैंगिक शोषण होत असल्याची घटना पुढे आली आहे.

वृत्तसंस्था

संजय राठोड -

यवतमाळ: यवतमाळात एका 25 वर्षीय मुलीवर गेल्या 4 वर्षांपासून सतत लैंगिक शोषण होत असल्याची घटना पुढे आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत या तरुणीवर लैंगिक शोषण होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केलीये (Accused arrested for sexually abusing a 25 year old young woman from 4 years In Yawatmal).

यवतमाळ (Yawatmal) येथील मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात 25 वर्षीय तरुणीवर विलास रामपुरे नावाच्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत तिचे सतत चार वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक (Arrest) केली आहे. यासंदर्भात पीडितेने मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

खेकडवाई येथील आरोपी विलास मनोहर रामपुरेने मागील चार वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून तरुणीवर लैंगिक शोषण केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विलास मनोहर रामपुरे याच्याविरुद्ध लैंगिक शोषण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT