Latur Police दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

बनावट फेसबुक अकाउंट उघडून महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीस अटक

लातूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी

दीपक क्षीरसागर

लातूर: काही दिवसापूर्वी लातूर येथे राहणाऱ्या एका महिलेचे फोटो (Photo) व वैयक्तिक माहितीचा वापर करून, अज्ञात आरोपीने (accused) खोटे बनावट फेसबुक (Facebook) अकाउंट ओपन करून त्यावरून पीडित महिलेची बदनामी करून त्रास देत असल्याचे तक्रार दिल्याने पोलीस (Police) ठाणे लातूर ग्रामीण (Rural) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा-

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर (Latur) ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सायबर सेल मदतीने गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. सदर गुन्ह्याचे तपासात संतोष तुळशीराम बयवाड या आरोपीने तयार केलेल्या बनावट फेसबुक अकाउंटच्या तांत्रिक व सखोल विश्लेषण करून सदरचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेला विनाकारण त्रास देणारा आरोपी संतोष तुळशीराम बयवाड यास सदर गुन्ह्यात अटक (Arrested) करण्यात आली आहे.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि २ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. सदरच्या आरोपीने बनावट फेसबूक अकाउंट तयार करून आणखीन कोणत्या महिला आणि मुलींची फसवणूक केली आहे का? काय याबाबतचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT