Pen dadar sagri police station saam tv
महाराष्ट्र

Pen News : बंदूक साफ करताना महिला पोलिसासोबत विपरीत घडलं; अख्खं पोलीस ठाणं हादरलं

Pen Dadar Sagri police station latest News : पेणच्या दादर सागरी पोलीस ठाण्यात दुर्दैवी अपघात घडला. बंदूक साफ करताना गोळी सुटून ती महिला पोलीस कर्मचाऱ्याला लागली.

Nandkumar Joshi

सचिन कदम, साम टीव्ही, पेण

Shocking News in Pen : बंदूक स्वच्छ करताना मोठा अपघात घडला. बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती महिला पोलीस कर्मचाऱ्याला लागली. यात ती जखमी झाली आहे. पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाण्यात ही घटना घडली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पेण तालुक्यात दादर सागरी पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली. या घटनेनं अख्खं पोलीस ठाणं हादरलं. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचारी बंदूक स्वच्छ करत असताना, अचानक त्यातील गोळी सुटली आणि ती महिला पोलिसाला लागली. यात ती जखमी झाली आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली.

पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दादर सागरी पोलीस ठाण्यात ही घटना घडली. महिला पोलीस कर्मचारी नुतन लाड या बंदूक साफ करत होत्या. त्याचवेळी अपघात घडला. बंदुकीतून गोळी सुटली. ती गोळी नुतन लाड यांच्या लागली. यात त्या जखमी झाल्या आहेत.

महिला पोलीस कर्मचारी नुतन या बंदूक साफ करत होत्या. त्याचवेळी बंदुकीतून चुकून गोळी सुटून त्यांच्या लागली. यात त्या जखमी झाल्या. बंदुकीतून सुटलेली गोळी त्यांच्या पायाला लागली आहे. पायाला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

घटनेनंतर एकच धावपळ

दादर सागरी पोलीस ठाण्यात महिला पोलीस नुतन लाड या बंदूक स्वच्छ करत असतानाच अचानक गोळी सुटली. ती त्यांच्या पायावर लागली. यात त्या जखमी झाल्या. या घटनेनं पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली. जखमी झालेल्या नुतन लाड यांना पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, अशी माहिती देण्यात आली.

पोलीस अधीक्षकांसह अधिकारी भेटीला

बंदुकीतून गोळी सुटून जखमी झालेल्या नुतन लाड यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या घटनेने संपूर्ण पोलीस विभाग हादरले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी महिला कर्मचारी लाड यांची तात्काळ भेट घेऊन विचारपूस केली. तसेच घटनेबाबत चौकशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT