Accident News saam tv
महाराष्ट्र

Amravati Accident: दुर्दैवी! ट्रक दुचाकीचा भीषण अपघात; एकाच जागीच मृत्यू

Accident News in Marathi: या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Shivani Tichkule

अमर घटारे

Amravati News: अमरावती जिल्ह्यतील धामणगांव यवतमाळ रोडवर दत्तापूर येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तापूर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक हा यवतमाळ कडून धामणगावच्या दिशने येत असताना दुचाकी आणि ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. मृतकाची ओळख पटलेली नसल्याने, या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

भरधाव ट्रकची ट्रॅव्हल्सला मागून धडक! 

 पुणे-बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) ४ जणांचा मृत्यू झाला तर १८ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली.

अपघातग्रस्त बस ही खासगी कंपनी निता ट्रॅव्हल्सची असून ती रात्री प्रवाशांना घेऊन कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. तसेच ज्या ट्रकने बसला धडक दिली तो मालवाहतूक करणारा मोठा ट्रक होता. या ट्रकमध्ये साखरेचे पोती भरलेली होती.

घटनेची माहिती मिळताच या अपघात स्थळी रेस्क्यू टीम दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात (Pune Accident) जखमी अवस्थेत असलेल्या एकूण १८ प्रवाशांना पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांजला पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

SCROLL FOR NEXT