ACB, Bribe, sangli Saam Tv
महाराष्ट्र

Revenue Department News : आईने मुलाला द्यायला सांगितली लाच, दाेघे एसीबीच्या जाळ्यात; महसूल खात्यात खळबळ

दाेन हजार रुपयांची मागणी करण्यात आली हाेती.

विजय पाटील

Revenue Department News : सांगली जिल्ह्यातील विट्यातील महसूल विभागाच्या सेतू कार्यालयात एक हजार सातशे रुपयांची लाच घेताना संगणकचालक महिला कर्मचाऱ्याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यामुळे महसूल खात्यात एकच खळबळ उडाली. (Maharashtra News)

श्रीमती पुजा किशोर साळुंखे असे महिलेचे नाव असून ती सेतू कार्यालयातील संगणक चालक असून तिचा मुलगा प्रतिक किशोर साळुंखे याच्यामार्फत लोकांकडून पैसे घेत असे. एसीबीने (acb) सापळा रचून दाेघांनाही पडकले आहे.

एका तक्रारदाराच्या भावाच्या नावाचे नॉनक्रिमिलेयर दाखल्याचे प्रकरण प्रांत कार्यालयास पाठवण्यासाठी विट्यातील तहसील कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू कार्यालयामधील महिला संगणक चालक श्रीमती पूजा साळुंखे यांनी २ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर संबंधित तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोमवारी (५ डिसेंबर) संपर्क साधून तक्रार दिली होती. (sangli latest marathi news)

यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खास कार्यप्रणालीप्रमाणे या तक्रारीची पडताळणी केली. यावेळी श्रीमती पूजा साळुंखे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती १ हजार ७०० रुपयेवर हा व्यवहार ठरला. यानंतर मंगळवारी दुपारी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचला. (Breaking Marathi News)

यावेळी श्रीमती साळुंखे यांनी ठरलेली १ हजार ७०० रुपयांची लाचेची रक्कम तिचा मुलगा प्रतिक किशोर साळुंखे यांचेकडे देण्यास सांगितली. त्याप्रमाणे प्रतिक साळुंखे हा लाचेची (bribe) रक्कम तक्रारदाराकडून स्विकारल्यानंतर दोघांनाही पकडण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT