Sangli, Crime News, ACB, Bribe Saam Tv
महाराष्ट्र

Bribe : रजा मंजूरीसाठी पैशांची मागणी, गट शिक्षण अधिका-यासह दाेघे एसीबीच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेच्या मुचंडी येथील कन्नड शाळेत लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

विजय पाटील

Sangli News : सांगली (sangli) जिल्ह्यात लाच घेताना गट शिक्षण अधिकार्‍यांसह दोघांना एसीबीनं पकडलं आहे. रजा मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडं पंधरा हजार रुपयांची लाच मागितले हाेते. या तक्रारीची सहनिशा करुन एसीबीनं (acb) सापळा रचला. या सापळ्यात गटशिक्षण अधिकारी यांच्यासह दाेघे जण सापडले. या घटनेनंतर जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. (Sangli Latest Marathi News)

तीन महिन्यांची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी प्रत्येक महिन्याचे वीस हजार असे एकूण साठ हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली हाेती. त्यापैकी पंधरा हजार रुपये लाच घेताना सांगली जिल्ह्यातील जत येथील पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकार्‍याला रंगेहात पकडण्यात आले. (Maharashtra News)

जिल्हा परिषदेच्या मुचंडी येथील कन्नड शाळेत लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रतिलाल मन्याप्पा साळुंखे आणि उपशिक्षक कांताप्पा दुंडाप्पा संन्नोळी अशी लाच घेतलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांनी अर्जीत रजा मंजूर करण्यासाठीचा अर्ज गट शिक्षण अधिकारी जत यांना सादर केला होता. ही रजा मंजूर करून देण्यासाठी पंचायत समीती जत येथील गट शिक्षण अधिकारी रतिलाल साळुंखे यांनी आणि मुचंडी येथील सिध्दीहळ वस्ती वरील जिल्हा परिषद कन्नड शाळा येथील उपशिक्षक संन्नोळी यांनी लाच मागितली हाेती.

यामध्ये तीन महिन्याच्या रजेसाठी प्रत्येक महिन्याचे 20 हजार असे एकूण 60 हजार रुपये मागण्यात आले. याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली होती. तक्रारीनुसार पडताळणी केली असता उपशिक्षक सन्नोळी यांनी 60 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तक्रारदारास एका महिन्याचे 15 हजार सन्नोळी यांचेकडे देण्याबाबत सांगण्यात आले. दरम्यान मुचंडी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा येथे लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचत सन्नोळीस 15 हजार रुपये घेताना रंगेहात पकडलं. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा कटलेट; वाचा ही सोपी रेसिपी

Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT