ACB, Bribe  Saam Tv
महाराष्ट्र

Zilla Parishad News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागतील शाखा अभियंता लाच घेताना सापडला; गुन्हा दाखल

आयुब शेख हे बार्शी तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहेत.

विश्वभूषण लिमये

Zilla Parishad News : कामाचे बिल तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना बार्शी येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागतील शाखा अभियंता आयुब दस्तगीर शेख यांना त्यांच्यात कक्षात एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (solapur latest marathi news)

नारीवाडी येथील हनुमान मंदिरास सभामंडपाचे काम ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करण्यात आले. नंतर या कामाचे बिल मंजूर होण्यासाठी यातील तक्रारदाराने पाठपुरावा करत असताना या कामाचे अंतिम मोजमाप घेऊन त्याचे बिल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी उपअभियंता यांचेकडे सादर करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची (bribe) मागणी केली. (Maharashtra News)

ही लाच रक्कम बांधकाम उपविभाग बार्शी (barshi) कार्यालयातील शाखा अभियंता कक्षामध्ये स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आयुब शेख हे बार्शी तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहेत. येत्या काही दिवसात त्यांचे प्रमोशन होणार होते. मात्र, त्याआधी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (acb) सापळ्यात अडकले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

SCROLL FOR NEXT