Crime News, Bribe , Latur Saam Tv
महाराष्ट्र

Bribe : रजा मंजूरीसाठी सहा हजार घेतले; मुख्याध्यापकासह लिपिक अटकेत

या घटनेमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या घटनेने शिक्षण क्षेत्राला गालबोट लागले आहे.

दीपक क्षीरसागर

Bribe : शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लातूर येथे शिक्षिकेची रजा मंजूर करण्यासाठी लाच (bribe) घेताना एसीबीनं (acb) मुख्याध्यापक आणि लिपिकास रंगेहाथ पकडलं. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Latur Latest Marathi News)

लातूर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असताना शिक्षिकेची एक आठवड्याची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी शिक्षिकेच्या पतीकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना लातूर येथील सदानंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि लिपिक या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. सुधाकर पोतदार असं मुख्याध्यापक तर शशिकांत खरोसेकर असं लिपिकाचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी - काल सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी शाळेच्या कार्यालयात मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी शिक्षिकेच्या पतीकडून एका आठवड्याची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी त्यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांना रंगेहाथ पकडलं. या घटनेमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या घटनेने शिक्षण क्षेत्राला गालबोट लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

SCROLL FOR NEXT