bribe news, amravati news, Amravati Latest Marathi News,  Saam Tv
महाराष्ट्र

तीस हजाराची लाच घेताना उच्च शिक्षण सहसंचालकास एसीबीने रंगेहाथ पकडलं

या घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावती (amravati) येथील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील सहसंचालक डॉक्टर मुरलीधर वाडेकर यास तीस हजार रुपयांची लाच (bribe) घेताना एसीबीने (acb) पकडले. या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. (amravati latest marathi news)

प्राध्यापकांच्या कोणत्याही कामासाठी पैसे घेतल्याशिवाय सहसंचालक डॉ. वाडेकर सहीच करत नसतं अशी चर्चा सातत्याने हाेत असे. एका प्राध्यापकाने वाडेकर यांच्या विराेधात एसीबीकडे तक्रार केली. अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहनिशा केली.

एसीबीने वाडेकर यांना तीस हजार रुपयाची लाच घेताना त्यांच्या कार्यालयातच रंगेहाथ पकडले. त्यानंतर वाडेकर यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या घरातून छत्तीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

दरम्यान उच्च शिक्षणाचे पाचही जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेले अमरावती येथील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात गेल्या वर्षभरापासून वाडेकर यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या भ्रष्टाचार अखेर थांबल्याची चर्चा शिक्षण विभागात हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा राजीनामा, कारण काय?

SCROLL FOR NEXT