नात्याला काळिमा! बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वहिनीवर बलात्कार Saam Tv
महाराष्ट्र

नात्याला काळिमा! बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वहिनीवर बलात्कार

सातारा जिल्ह्यामधील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक नात्याला काळिमा फासणारी घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा : सातारा जिल्ह्यामधील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका तरुणाने अश्लील फोटोज व्हायरल करण्याची धमकी (photos) देत, आपल्या वहिनीवरच बलात्कार (brother in law raped sister in law) केला आहे. नराधम आरोपीने (accused) मागील काही काळापासून आपल्या वहिनीचे वारंवार लचके तोडले आहेत. आरोपीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसामध्ये (Police) धाव घेतली आहे.

या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी आरोपी दिराविरोधामध्ये बलात्कारासह ब्लॅकमेल (Blackmail) आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय पीडित महिला सातारा (Satara) जिल्ह्यामधील एका गावात आपल्या पतीसोबत राहत होती. तिला एक मुलगा देखील आहे. ३ ऑक्टोबर दिवशी पीडित महिलेचा चुलत दीर पीडितेच्या घरी आला होता.

हे देखील पहा-

यावेळी घरात कोणीही नव्हते. याची संधी साधून आरोपीने पीडितेला बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तसेच जवळीक साधून आरोपीने आपल्याच वहिनीवरच बलात्कार (abuse)केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलेचे नग्नावस्थेमधील अनेक फोटो देखील काढले होते. या प्रकारानंतर आरोपीने घटनेची वाच्यता केल्यास मुलाला आणि पतीला जीवे मारून टाकायची, अशी धमकी दिली होती.

यामुळे पीडित महिलेने संबंधित घटनेची माहिती कोणालाही दिली नाही. यानंतर आरोपी दिराने संबंधित फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली.

यानंतर कुटुंबीयांनी बोरगाव (Borgaon) पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी दिराविरोधामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कार, ब्लॅकमेल आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी दिराला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT