Wardha Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Crime News : अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करीत वर्ध्यात विवाहितेवर अत्याचार

आरोपी विरोधात गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

Wardha Crime News : विवाहितेचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करीत बळजबरीने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. अखेर त्रस्त होवून पीडितेने याबाबतची तक्रार अमरावती पोलिसात दिली. घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने अमरावती पोलिसांनी तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

विवाहिता ही पतीला न सांगता वर्धा (Wardha) येथील म्हाडा कॉलनीतील रहिवासी तिच्या मैत्रिणीकडे ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आली होती. मैत्रिणीच्या आजीला भेट देण्यासाठी पीडिता ही स्वयंपकखोलीत कपडे बदलवित असतानाच आरोपी राकेश आडे रा. म्हाडा कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ याने पीडितेचा विवस्त्र व्हिडीओ स्वतहाच्या मोबाईलमध्ये काढून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करु लागला.

पीडितेने नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देत पीडितेशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करुन पीडितेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून अमरावती येथील पोलीस (Police) ठाण्यात आरोपी राकेश आडे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातून ती तक्रार रामनगर पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपी राकेश आडे विरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT