abdul sattar 
महाराष्ट्र

पैशाच्या जोरावर भाजप जिंकली; अब्दुल सत्तार

भूषण अहिरे

धुळे : धुळ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. यादरम्यान मंत्री सत्तार यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश संपादन केलेल्या उमेदवारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजपवर चांगलच तोंडसुख घेतल आहे. abdul-sattar-feliciated-zp-members-dhule-criticzes-bjp-political-news-sml80

सत्तार म्हणाले जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक भाजपने पैशांच्या जोरावर जिंकली असल्याचा दावा करीत एवढी मोठी रसद कोण पुरवत हे देखील राज्य सरकारच्या माध्यमातून पाहणे आवश्यक आहे. केंद्रसरकारमधील काही लोक राज्यात आलेत आणि गावा गावात फिरू लागले. आपण देखील यांची चौकशी लावली पाहिजे. भाजपचे जर सरकार केंद्रात आहे तर आपले देखील सरकार राज्यात आहे. त्यामुळे यांची देखील चौकशी आपण करु शकू. सत्तार यांनी भाजपची जिरवायची असेल तर राज्य सरकारने चौकशी लावलीच पाहिजे असा आग्रह धरला आहे. abdul-sattar-feliciated-zp-members-dhule-criticzes-bjp-political-news-sml80

मंत्री सत्तार यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावर एका कुत्र्याचे पिल्लू आले. सत्तार यांनी त्याच्याकडे पाहत हे आपल्या पक्षाच नाही असे म्हटलं. त्या कुत्र्याच्या पिल्लाकडे पुन्हा बघून आपण काय बोलत आहोत हे ऐकण्यासाठी त्याला पाठवले असेल असे म्हणत नाव न घेता त्यांनी विराेधकांचा (भाजप) समाचार घेतला. दरम्यान सत्तार यांनी लगावलेला टोल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच हाशा पिकला.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजप आपल्यावर सुडाचे राजकारण यासाठी करीत आहे की पहाटे शपथविधी झाल्यानंतर देखील त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले असल्याचा राग त्यांच्या मनात आहे. दरम्यान सत्तार यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT