AAP | Punjab Election | Bhagvant Mann | Arvind Kejariwal  SaamTvNews
महाराष्ट्र

पंजाबमध्ये 'AAP'च्या विजयाचा वारू; भगवंत मान म्हणाले, ७० वर्षांची घाण साफ होणार!

दुसऱ्याच प्रयत्नात पंजाब राज्य आपच्या खिशात!

Krushnarav Sathe

Election Result 2022 Punjab : देशात पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. ५ पैकी ४ राज्यात भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, पंजाब (Punjab) काबीज करत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केवळ दुसऱ्याच प्रयत्नात पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत आपने विजय मिळावला आहे. दरम्यान, पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन होत आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या तब्बल ९१ जागा मिळवत आम आदमी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर भाजप, काँग्रेस आणि अकाली दलाचा पार सुफडा साफ झाला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का बसला असून अंतर्गत गटबाजीचे राजकारण काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव होणे जवळपास निश्चितच झालं आहे. तर, काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यानंतर पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. मात्र, या दोन्हीही माजी मुख्यमंत्र्यांना पराभवास सामोरे जावे लागत आहे. पटियाला मधून कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत झाले आहेत. तर, चन्नी यांचा पराभव निश्चित झाला आहे. त्याचवेळी धुरी मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

सत्तेच्या चाव्या हातात घेऊन आप सरकार स्थापन करणार आहे. बहुमत प्राप्त केल्यानंतर भगवंतसिंग मान (Bhagvant Singh Mann) म्हणाले, मुख्यमंत्री होताच सरकारी कार्यालयात भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे लावण्याचा पहिला निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल. 10 मार्चपासून नवा पंजाब सुरू होत आहे. आम्ही मान्य करतो की आम्ही गेल्या वेळी चुका केल्या, परंतु आम्ही चुकांमधून शिकलो. मला वाटते की यावेळी आपचा झाडू 70 वर्षांची घाण साफ करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT