Aamir Khan reportedly faces threat claims from Bishnoi gang after his third marriage controversy goes viral. saam tv
महाराष्ट्र

बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान, तिसरं लग्न आणि धमकी...आमिर खान खरंच लव्ह जिहादी?

‘Love Jihad’ Claim Sparks Controversy as Aamir Khan Receives Threat: सलमान खाननंतर आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर आलाय... मात्र आमिर बिश्नोई गँगच्या निशाण्यावर का आला त्याचं कारण काय पाहा..या रिपोर्टमधून....

Snehil Shivaji

सलमान खान, रोहित शेट्टी, कपिल शर्मानंतर आता लॉरेंन्स बिश्नोई गँगची वक्रदृष्टी थेट बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर पडलीये. अमिर खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर येण्यामागे कारण ऐकलंत तर तुम्ही थक्क व्हाल. बिश्नोई गँग आता आमिर खानच्या मागावरये त्याचं कारण आहे, आमिर खाननं केलेलं तिसरं लग्न. होय.. तुम्ही बरोबर ऐकलंय. तिसरं लग्न केल्यानं आमिर खानचा जीव धोक्यात आलाय. आमिर खान लव्ह जिहाद करत असल्याचा आरोप करत बिश्नोई गँगनं आमिर खानला जिवे मारण्याचा प्लॅन तयार केल्याचं या धमकीच्या ऑडिओमध्ये समोर आलंय. हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी साम टीव्ही ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची कोणतीही अधिकृत पुष्टी करत नाही. पण या कथित धमकीत नेमकं काय म्हटलंय, पाहा...

ऐकलंत... आमिर खाननं हे तिसरं लग्न केलं म्हणून त्याला थेट 'लव्ह जिहादी' म्हणत त्याची हत्या करण्याची धमकी कशी देण्यात आलीये. पण आमिर खानची तिसरी बायको ही ख्रिस्ती समुदायाची असूनही तिच्यासोबत लग्न केल्यानं लव्ह जिहाद कसा? समाजमाध्यमांवर सध्या आमिर खानच्या वैयक्तिक निवडीवरून अनेक उलट-सुलट चर्चा आणि दाव्यांना उधाण आलंय. या वादाच्या केंद्रस्थानी आमिर खानची लग्नं राहिली आहेत. गेल्या चाळीस वर्षातील आमिर खानच्या लग्नांचा इतिहास पाहा ग्राफिक्सच्या माध्यमातून.

पहिली पत्नी

रीना दत्ता

लग्न १८ एप्रिल १९८६

दुसरी पत्नी

किरण राव

लग्न २८ डिसेंबर २००५

तिसरी पत्नी

गौरी स्प्रॅट

लग्न ५ जुलै २०२६

आमिर खानचं पहिलं लग्न हे हिंदू समाजातील रीना दत्ता यांच्यासोबत झालं, त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. २००५ मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरं लग्न थाटलं. किरण राव या तेलगू हिंदू कुटुंबातील असून त्यांचाही घटस्फोट ५ वर्षांपूर्वी २०२१ मध्ये झाला. आता या घटस्फोटानंतर ५ वर्षांनी आमिरने थेट ख्रिस्ती धर्मिय गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं आणि याच तिसऱ्या लग्नावरून त्याला आता थेट लव्ह जिहादी म्हणत कोंडीत पकडलं गेलंय.

ज्या लव्ह जिहादचे आरोप आज आमिर खानवर होतायेत, त्याच्या दोन्ही सख्ख्या बहिणींनी हिंदू मुलांसोबत विवाह केलाय. तर खुद्द आमिर खानच्या मुलीचं लग्न अडीच वर्षांपूर्वी नुपूर शिखरे या मराठी तरुणासोबत थाटामाटात पार पडलं होतं. स्वतः आमिर खाननेही आपल्या तिन्ही बायकांनी कधीही धर्मांतर केलं नसल्याचं स्पष्ट केलंय. असं असताना, एखाद्या कलाकाराने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या खाजगी निर्णयावरून सार्वजनिक पातळीवर त्याला जनमानसात उपहासाचा धनी बनवणे आणि थेट जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे त्याच्या स्वातंत्र्यावर आणि अधिकारांवर घाला घालण्यासारखं आहे. लॉरेन्स बिश्नोई गजाआड असूनही, जर त्याची गँग रोज लोकांना धमकावून कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगत असेल, तर ही गँग धर्माच्या नावावर पोलिसांनाही जुमानत नाही हे स्पष्टये..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

शिंदे घराण्याची 500 वर्ष जुनी 3000 किलोची तोफ चोरीला; दरोडेखोर घेऊन आले होते ट्रक अन् क्रेन

Women Weight Loss: योगा किंवा एक्सरसाईज न करताही कमी करा वजन; महिलांनी फक्त फॉलो करा हे सोपे डाएट टिप्स

Soybean Chilla: नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त टेस्टी सोयाबीन चीला; फक्त १५ मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT