भिवंडीत टेमघर येथे भंगार साठवलेल्या गोदामाला भीषण आग
भंगार गोदामात बॅटरी तसेच ज्वलनशील पदार्थांची मोठी साठवणूक
भंगार गोदाम भिवंडी ठाणे मीरा भाईंदर शहरारा पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या जल शुद्धीकरण केंद्रालगत आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल
बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती एमआयडीसी, तांदुळवाडी बौद्ध विहार तसेच काटेवाडी परिसरात ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा आणि परिसरावर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
भंगार गोदामात बॅटरी तसेच ज्वलनशील पदार्थांची मोठी साठवणूक
भंगार गोदाम भिवंडी ठाणे मीरा भाईंदर शहरारा पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या जल शुद्धीकरण केंद्रालगत आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल
पुण्यातील विषारी "दारूकांड" तपास सी आय डी करण्याची शक्यता
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील "दारूकांड" प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला जाणार
दोन्ही शहरात विषारी दारू प्राशन केल्यामुळे १५ पेक्षा अधिक लोकांचा झाला होता मृत्यू
पुण्यातील हडपसर तर पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथील अनेक जणांचा यात मृत्यू
दादरमध्ये महानगर गॅस पाइपलाइन फुटली, मोठ्या प्रमाणात गळती
दादरमध्ये महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. त्यामुळं मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत आहे. दादरच्या गोखले रस्त्यावर ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत
मनोज जरांगे हे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ त्याच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड हे देखील आहेत. यावेळी नेत्यांकडून जरांगे यांना माहिती दिली जात आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, असे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल सय्यद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन.
खासदार संदिपान भुमरे, मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती.
बाजीराव चव्हाणांकडुन कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली सुपूर्द
एकीकडे इंधन टंचाई असताना दुसरीकडे सर्रासपणे पेट्रोल डिझेलची साठेबाजी करण्यात येत आहे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना नवगण राजुरी येथे पेट्रोलची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून ४५ लिटर पेट्रोल जप्त करत संबंधित हॉटेल चालकास ताब्यात घेतले आहे.
अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयात दुपारी पाहणी केली असता गटविकास अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचारी कार्यालयातून गैरहजर असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कार्यालयातील एकही टेबलवर कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
म्हसळा पंचायत समितीमध्ये मटण पार्टी
गट विकास अधिकारी माधव जाधव यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने वडे मटणाच्या जेवणाचा बेत
म्हसळा पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासकिय इमारतीमध्ये मारला मटण वड्यावर ताव
परभणी जिल्ह्यात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळत भाजप कार्यकर्त्यांनी केले निषेध आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते या आंदोलनाला सहभागी होते
780 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साई चरणी अर्पण...
आकर्षक नक्षीकाम केलेल्या मुकुटाची किंमत तब्बल 92 लाख रुपये...
उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील साईभक्त गोविंद गोयल यांच्याकडून साई चरणी सुवर्ण दान...
साई संस्थानकडून दानशूर साईभक्ताचा सत्कार..
- हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची भर उन्हात भटकंती
- आदिवासी भागातील बांधवांचा जगण्याचा संघर्ष, खोल विहिरीत उतरून दूषित पाणी आणण्याची आदिवासी ग्रामस्थांवर वेळ
- गावाजवळील विहिरी पडल्या कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी तळपत्या उन्हात दोन दोन किलोमीटरची पायपीट
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भागओहोळ, बेरवळ, देवडोगरा गावांसह अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई
- परिसरातील विहिरींनी तळ गाठल्यानं जीव धोक्यात घालून पाण्यासाठी उतरावे लागते विहिरीत
- विहिरीच्या तळाला असलेलं गढूळ आणि दूषित पाणी पिण्याची परिसरातील आदिवासी नागरिकांवर वेळ
- स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील आदिवासी भागात हंडाभर पाण्यासाठी करावा लागतोय संघर्ष
पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पुणे शहरातील हडपसर तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला कठोर कारवाई करून या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सखोल चौकशी करून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीअंती नियमानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल.
शेतकऱ्यांना नियमितपणे आठ तास वीज मिळावी अशी मागणी करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी वीज मंडळाच्या गेटवर चढून आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. वीज मंडळाकडून शेतकऱ्यांना अनिमित वीजपुरवठा केला जात आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणी वंचित सम्यक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...
दोषींवर कठोर कारवाई व आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदतीची मागणी
पुण्यातील हडपसर परिसरात पांढरे मळा येथे असलेला हातभट्टी दारूचा अड्डा स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला उध्वस्त.. या ठिकाणची दारू पिऊन पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पत्र्याचे शेड उध्वस्त करून टाकलं.. या ठिकाणी दारूवाशी कुठे चालू देणार नाही अशी भूमिका घेतली
तुळजापूरात मटक्याचा बाजार खुलेआम सुरू
तुळजापूर शहरातील मुख्य रहदारीच्या नवीन बस स्टँड पाठी मागेच पोलीस प्रशासनाच्या नाकावरच टिचून मटक्याचा दरबार
तुळजापुरात देशभरातुन मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात भाविक
मटका खेळवणारे व लावणारे अगदी बिनधास्त पणे हा धंदा चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
तेरा वर्षीय बलात्कार पीडितेच्या वैद्यकीय तपासणीसाठी दहा तास ताटकळत ठेवायच्या प्रकरणात बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश कुमार सोळंके यांनी केंज उपजिल्हा रुग्णालय प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली.
यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे असा प्रकार घडल्याचा सोळंके यांनी सांगितलं .
संवेदनशील प्रकरणामध्ये व्यवस्थित पद्धतीने हँडल केला नाही यामुळे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर वर कारवाई करणार असल्याचं शल्यचिकित्सक यांनी सांगितलं.
दौऱ्यादरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतले परळीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन .
पक्षबांधणीसाठी मराठवाडाभर दौरे सुरू
अंबरनाथ नगरपालिकेत लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा नवा वाद उफाळून आला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांनी थेट त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत अनोखे आंदोलन केले.
डिझेल टंचाईविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात शेतकऱ्यांनी अनोखा निषेध नोंदवला. आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून 5 किलोमीटर अंतरावरील डोणगाव येथील पेट्रोल पंपावर नेला.
गडचिरोलीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाचे प्रतिक म्हणून वाहनधारकांना चॅाकलेटचे वाटप करण्यात आले.
शहराध्यक्ष श्रीकांत पाटील निवडणूक लढवणार
पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित
श्रीकांत पाटील यांना विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शरद पवारांचा आदेश
श्रीकांत पाटील यांना शरद पवारांचा फोन
श्रीकांत पाटील थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
- शहरातील त्रंबक नाका परिसरातील पेट्रोल पंपावर काँग्रेसचे आंदोलन
- इंधन दरवाढी विरोधात नाशिकमध्ये काँग्रेस आक्रमक
- LPG गॅस आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
- सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
- संविधान चौकातून निघालेल्या आंदोलनाला नारंग टावर जवळ अडवण्यासाठी पोलिसांनी लावली होती बॅरिकेट .
- मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी बॅरिकेट ओलांडून आकाशवाणी चौका कूच केले...
- आकाशवाणी चौकावरही पोलिसांना आपले वाहन आडवे लावून मोर्चा अडवावा लागला...
- आकाशवाणी चौकातून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक रित्या पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय कडे जातील म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी निर्माण करत तिथे मोर्चा अडवला.
- आता काँग्रेसचे निवडक नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले आहे
- संविधान चौकातून निघालेल्या आंदोलनाला नारंग टावर जवळ अडवण्यासाठी पोलिसांनी लावली होती बॅरिकेट
- मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी बॅरिकेट ओलांडून आकाशवाणी चौका कूच केले
- आकाशवाणी चौकावरही पोलिसांना आपले वाहन आडवे लावून मोर्चा अडवावा लागला
- आकाशवाणी चौकातून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक रित्या पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय कडे जातील म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी निर्माण करत तिथे मोर्चा अडवला.
- आता काँग्रेसचे निवडक नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले आहे..
- सरकारचे शिष्टमंडळ व मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई.
- यापूर्वी छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर असताना आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचा झाला होता आरोप.
- प्रसाद लाड पुन्हा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आल्यानंतर काळे झेंडे दाखवणार असा मराठा आंदोलकांनी दिला होता इशारा.
- गणेश उगले, सतीश देवखळे, अंकुश सकुंडे व योगेश शेळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती.
शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर डेक्कन एक्सप्रेस मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतूक ठप्प झालीये. उद्यान एक्सप्रेससह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबल्या आहेत. तर डाऊन मार्गावरील कर्जत खोपोली गाड्या बदलापूर रेल्वे स्थानकातूनच सीएसएमटी स्थानकाकडे पाठवण्यात येत आहेत.
जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला
कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरण्यात आली.
कर्जमाफी करावी, शेतमालाला भाव द्यावा शेतकऱ्यांसाठी डिझेल राखीव ठेवावे यासह विविध मागण्यांसाठी शरद पवार गट आक्रमक..
जामनेर मधील मुख्य चौकात तिन्ही बाजूची वाहतूक रोखत राष्ट्रवादी शरद गटाच्या वतीने आंदोलन.
पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात आठ जणांचा मृत्यू हा विषारी दारू प्राशन केल्याने झाल्याचे धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात योगेश वानखेडे नामक व्यक्तीला ताब्यात घेतला आहे तसेच. ज्या दारूचे कॅन मध्ये विषारी दारू ग्राहकांना विक्रीत करण्यात आली त्या कॅनदेखील पोलिसांनी आता ताब्यात घेतल्या आहेत.
सोलापुरात शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्यावर तीन दिवसांनी गुन्हा दाखल,मात्र गुन्ह्यात जागा मालकाचे नाव न घेतल्याने अनेक चर्चांना उधाण
- भिवापूर तालुक्यात किन्हाळा येथे गोठ्यासह तणीसाचा ढिग जळून खाक, उन्हामुळे आगीच्या घटनांना वाढ.....
- धामणगावातील भीषण आगीची घटना ताजी, छोटीशी आग लागून गावात पसरली 20 नेते 25 घर जळाले असल्यानं होती भीती..
- भिवापूर पोलीस स्टेशन हद्दीतील किन्हाळा गावात आग
इचलकरंजी शहरात आयपीएल बेटिंग रॅकेटवर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आमदारांचे समर्थक आणि भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पोवार यांच्यासह तब्बल नऊ जणांना अटक करण्यात आली आहे
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने दोन गुंतागुंतीच्या ओव्हेरियन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. पहिल्या प्रकरणात ६५ वर्षीय महिलेवरील मोठ्या अंडाशयाच्या गाठीची शस्त्रक्रिया डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात २६ वर्षीय तरुणीच्या पोटातील दुर्मिळ कॅन्सरयुक्त ‘मिक्स्ड जर्म सेल ट्युमर’ यशस्वीरित्या काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया डॉ. मयुर दुधे व त्यांच्या पथकाने केली. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा रुग्णालयातच अशा अत्याधुनिक व मोफत शस्त्रक्रिया होत असल्याने गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप आज होणार आहे.
आज सकाळी 11 वाजता पहिली गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयाच्या प्रवेशाचे कट ऑफ गुणवत्ता जाहीर केले जातील.
गाई म्हशी पाळणार्या शेतकऱ्यांच्या मताच्या पेटीची गरज नाही का? तुम्हाला जाती पातीची फक्त मतं पाहिजेत का शेतकर्यांची नकोयत का ? असा संतप्त सवाल सत्तेत सहभागी असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बदलापूर पश्चिमकडेली सोनिवली परिसरात असलेल्या महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्याने वाढीव वीज बिलाबाबत तक्रार घेऊन आला होता. या कार्यालयात तक्रार घेऊन आलेल्या ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जनगणना करायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण
५ ते १० जणांकडून आधी शिवीगाळ आणि मारहाण
पुण्यातील महर्षीनगर मधील धक्कादायक घटना
स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल
सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कमी झाली असून काही दिवसांत पावसाची सुरूवात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.